Chhatrapati Shivaji Maharaj was a Maratha king (from Maharashtra) and a member of the Bhonsle Maratha clan. Shivaji Maharaj, in 1674, carved out an. Aug 9, 2019 - Download Powada Shivaji Maharaj Mp3 Song, Powada Shivaji Maharaj Free Mp3 Song Download, Powada Shivaji Maharaj Mp3, Powada. Shivaji The Diplomat. Shipping charges will be applicable for this book. Dagalbaj shivaji Suhas patil 09 Sep 2019 05 30 AM.
१९२६ साली वसंत व्याख्यानमालांमधे भोर येथे प्रबोधनकार ठाकरेंचं व्याख्यान झालं. विषय होता, ‘दगलबाज शिवाजी’. हे शीर्षक ठाकरी शैलीतलं अत्यंत प्रक्षोभक असं असलं तरी यात शिवरायांवरची नितांत श्रद्धाच आहे. यात दगलबाज या शब्दाचा अर्थ दगाबाज असा नाही तर डिप्लोमॅट, मुत्सद्दी असा आहे. या चाळीस पानांच्या छोट्या पुस्तिकेत शिवरायांवरचे सगळे आरोप तर्कशुद्ध पद्धतीने मोडून काढले आहेत. दोन अडीच आणे किंमतीच्या हे पुस्तक त्या काळी खूपच लोकप्रिय झाले होते. त्याच्या अनेक आवृत्त्या काढाव्या लागल्या होत्या.
------------------------------------
दगलबाज शिवाजी SHIVAJI – THE DIPLOMAT लेखक- श्री. केशव सिताराम ठाकरे, प्रबोधनकार प्रकाशक- रामचंद्र बाबाजी जाधव, प्रो. दासराम बुक डेपो बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, कोल्हापूर आवृत्ती- दुसरी किंमत- अडीच आणे प्रती- २००० श्रीसुदर्शन प्रेस, कोल्हापूर.
Dagalbaj Shivaji Pdf Book Download Free
-------------------------------------
``There is always a sacred veil to be drawn over the beginnings of all governments.’’ -Edmund Burke महाराष्ट्रापुरताच विचार केला, तर आज हिन्दूंची तेहतीस कोटी देवांची फलटण पेन्शनींत निघून, त्या सर्वांच्या ऐवजी एकटा शिवाजी छत्रपती परमेश्वर म्हणून अखिल म-हाठ्यांच्या हृदयासनावर विराजमान होऊन बसला आहे. शिवाजी म्हणजे म-हाठ्यांचा कुळस्वामी आणि महाराष्ट्राचा राष्ट्रदेव. `गॉड सेव्ह दि किंग’ या राष्ट्रगीताचे सूर बॅडमधून निघताच इंग्रेज लोकांत जे एक वर्णनीय चैतन्याचें वारे चट्कन् थरारते. तेच चैतन्य एका शिवाजी या नामोच्चारांत अवघा महाराष्ट्र अनुभवतो. वंदे मातरम् या राष्ट्रगीतालासुद्धा अजून म-हाठ्यांची अंत:करणे काबीज करतां येत नाहीत; याचे कारण शिवाजी शिवाय इतर कसल्याहि भावनेला तेथे जागाच उरलेली नाही. एवढे ज्या शिवरायाचे महात्म्य, त्याला `दगलबाज’ हे विशेषण लावणेचे धाडस प्रबोधनकारासारख्या जातीवंत म-हाठ्याने करावे, ही वस्त्रगाळ निमकहरामी होय! अशा शंकेचे काहूर वाचकांच्या वृत्तीत उठल्याशिवाय खास राहणार नाही. शिवरायासारख्या राष्ट्रवीराची कुचेष्टा करून, आपली प्रतिष्ठा वाढविणेचा प्रबोधनकाराचा हा बाष्कळ प्रयत्न तर नसेल? असाही कित्येक तर्क बांधतील. सर्व शंकितांना आम्ही आगाऊच ग्वाही देवून ठेवतो की प्रबोधकाराच्या खाणीच्या इतिहासात निमकहरामी आणि आत्मप्रतिष्ठा आजपर्यंत कोणलाही आढळलेली नाही. लेखन-संस्काराच्या गंधाक्षता प्रथम वाहून शिवचरित्राला चिरंजीव करण्याची आद्य कामगिरी याच खाणीतल्या बखरकारांनी बजावलेली आहे.
कालौघाने शिवरायाच्या शिव चारित्र्यावर लौकिकी कल्पनांनी जर भलभलत्या रंगांचा मारा करून, त्याचे खरे उज्वल रूप विकृत केले असेल, अगर ते तसे झाले असेल, तर त्याचा सप्रमाण मुद्देसूद निरास करून, लोकमताच्या वाजवी प्रबोधनासाठी प्रबोधनकाराने आपले शिवप्रासादिक कलमास्त्र परजणे, त्याचे कर्तव्यच आहे. हे कटु कर्तव्य आहे. कल्पनेने किंवा अंधश्रद्धेने काढलेले शिवरायाचे चित्र बाजूला सारून, त्या राष्ट्रवीराची खरीखुरी प्रतिमा धिटाईने लोकापुढे मांडणे, म्हणजे लोकक्षोभाला बळेच आव्हान देण्याइतकेच भयंकर काम आहे. पण ते कोणी तरी केव्हा तरी करणेच प्राप्त असल्यामुळे, लोकक्षोभाची पर्वा न बाळगतां हौसेने ते आम्ही आपल्या शिरावर घेतले आहे. -----------------------------------
शिवरायास आठवावे का आठवावे? आम्हाला तो नित्य आठवतोच का? विसरू म्हटले तरी तो का विसरला जात नाही? शिवरायाने केले तरी काय, की त्याचे महाराष्ट्राने आमरण स्मरणच करावे? माणसांची माणुसकी त्यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याने होत असते. ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही, परकीयांच्या राजसत्तेखाली जे जगत असते, त्या राष्ट्रांतल्या माणसांना `ह्यूमेन कॅटल’ माणशी गुरेढोरे हीच संज्ञा यथायोग्य शोभते. शिवाजीच्या हृदयांत राष्ट्रधर्माच्या या तीव्र भेदाची विद्युल्लता चमकेपर्यंत, सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत, महाराष्ट्रातला हिंदू म्हणजे ह्यूमन कॅटल बनलेला होता. तोंड असून मुका, कान असून बहिरा, डोळे असून आंधळा आणि माणूस असून परकीय मुसलमानी सत्तेच्या पखाली वाहणारा बैल होऊन राहिला होता. गुलामगिरीचा पेंड कडबा खाऊन खाऊन हा बैलसुद्धा इतका मस्तवाल बनला होता, की इस्लामी मानपानाच्या नक्षीदार झुली घुंगुरमाळांनी नटलेल्या त्याच्या अनेक पुढारी नंदीबैलांनी शिवाजीच्या राष्ट्रीय प्रबोधन – कार्यांत शेकडो वेळा शिंगे खुपण्यास कमी केले नाही. महाराष्ट्राला माणुसकी देण्याच्या महत्कार्यांत विरोधाचे जितके जितके बाण शिवाजी-गरुडाच्या काळजात घुसले, तितक्या तितक्या